शिशुवाटिकामध्ये गुरू पौर्णिमा साजरी

स्व विद्याधर भागवत यांच्या प्रतिमेला अर्पण करण्यात आला पुष्पहार

⚡सावंतवाडी ता.१३-: अटल प्रतिष्ठान संचलित वसंत शिशुवाटिका व विद्याधर भागवत शिशुवाटिका यांच्या संयुक्त विद्यमाने अटल प्रतिष्ठान मध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.सुरूवातीला अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. नकुल पार्सेकर यांनी आपले गुरू व जेष्ठ साहित्यिक स्व. विद्याधर भागवत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

यावेळी त्यांनी गुरू म्हणून आपल्या जीवनात भागवत सरांचे स्थान अढळ आहे. त्यांचे विद्यार्थी दशेत मिळाले मार्गदर्शन आणि प्रेरणा यामुळे आपली सामाजिक जडणघडण झाल्याचे सांगितले.. अटलचे कार्यवाह डॉ. राजशेखर कार्लेकर यांनीही सरांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली.

शाळेतील सर्व शिशुनी मातापुजनं केल. प्रधानाचार्य श्रीमती विजया रामाणे यांनी उपस्थित सर्व मातांना आपल्या जीवनात गुरुचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी शिशुवाटिका विभागाच्या व्यवस्थापिका डॉ. सौ. रश्मी कार्लेकर, आचार्या सौ. रसिका भराडी, सौ. सायली सरमळकर, श्रीमती मानसी
मोरजकर,सौ.सत्यभामा परब, चाईल्ड लाईनच्या श्रीमती प्रज्ञा तांबे, कु. पुनम पार्सेकर आणि पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

You cannot copy content of this page