Headlines

महिलेला वाचविल्याने काँग्रेसने केला पोलीस दत्ता देसाई यांचा सत्कार

⚡आंबोली ता.१२-:* शौर्य दाखवून एका महिलेला वाहत्या नदीच्या प्रवाहातून वाचवल्याबद्दल सावंतवाडी काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी हवालदार दत्ता देसाई यांचा सत्कार केला.

गेळे येथील पुलाखाली हिरण्यकेशी नदीच्या मोठ्या प्रवाहात कुटुंबासोबत सेल्फी काढताना पाय घसरून पुढे वाहत जावून एका झाडाच्या फांदीला पकडुन २५ मिनिटे होती. ही घटना कळताच आंबोली पोलीस तातडीने त्या ठिकाणी पोचले. यावेळी शौर्य दाखवत हवालदार दत्ता देसाई यांनी पाण्यात उडी मारून जान्हवी शिंदे कणकवली हिला वाचवले.

दत्ता देसाई यांनी या आदी देखील सावंतवाडी मोती तलावात बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचविले होते. त्यांच्या या शौर्याबद्दल पोलिस अधीक्षकांनी देखिल त्यांचा सन्मान केला.

आज आंबोली पोलीस चौकी येथे श्री दत्तात्रय देसाई यांना काँग्रेस चे तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी त्या महिलेचा जीव वाचवीला या बद्धलं शाल श्रीफळ आणी फुलगुच्छा देऊन शुभेच्छा दिल्या

यावेळी तालुका सरचिटणीस रुपेश आईर, बबन दिसोझा, बबलू दिसोझा आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page