कुंभारमाठ जरीमरी रस्त्याची दयनीय अवस्था

या रिक्षा चालक मालक संघटनेने आंदोलनाचा दिला इशारा

मालवण, दि प्रतिनिधी
कुंभारमाठ जरीमरी उताराच्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने अपघात होत असल्याने या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा महापुरुष फोवकांडा पिंपळ रिक्षा चालक मालक मित्रमंडळ मालवणच्या वतीने आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. याबाबतचे निवेदनही यावेळी सादर करण्यात आले.

मालवण कसाल या मुख्य रस्त्यावरील कुंभारमाठ जरीमरी येथील उताराच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सातत्याने अपघात घडत आहेत. या रस्त्यावरून शालेय मुलांची ये-जा सुरू असते. त्यामुळे या रस्त्याची तत्काळ डागडुजी करण्यात यावी या मागणीसाठी आज महापुरुष फोवकांडा पिंपळ रिक्षा चालक मालक मित्रमंडळ, भाजपचे पदाधिकारी तसेच अन्य नागरिकांच्या शिष्टमंडळाने येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत लक्ष वेधले.

यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष महेश मयेकर, सुधीर धुरी, संदेश मयेकर, मोहन वराडकर, भाऊ सामंत, श्रीपाद हळदणकर, प्रसाद परुळेकर, मनोज वाटेगावकर, मयू पाटकर, अवधूत परुळेकर, प्रमोद भोगावकर, तृप्ती लंगोटे, गणेश नलावडे आदी उपस्थित होते.

यावेळी या विषया संदर्भात यापूर्वी ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने पत्रव्यवहार करत लक्ष वेधले होते. मात्र अद्यापही याबाबतची कार्यवाही झालेली नाही. तरी या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती न झाल्यास आंदोलन छेडावे लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला.

You cannot copy content of this page