मावळ्यांची संकल्पना मुख्याधिकारी यांची

आ नाईक यांनी श्रेय घेवू नये;मनसेच्या अमित इब्रामपुरकर यांची टीका

⚡मालवण ता.१२-:मालवणच्या नवीन बंदर जेटीवर बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या पुतळ्याची संकल्पना मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांचीच असुन आमदार वैभव नाईक त्याचे श्रेय घेत आहेत. त्यापेक्षा आम. वैभव नाईकांनी मालवण शहरातील अर्धवट असलेल्या कामांचे श्रेय घ्यावे, अशी खोचक टीका मनसेचे अमित इब्रामपुरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

ओबीसी आरक्षण न्यायालयात असल्याने मालवण न.प.चे मुख्याधिकारी प्रशासक आहेत. सहा महिन्यापासून ही जबाबदारी पार पाडत आहेत. आपल्या कार्यकाळात प्रशासक म्हणुन दांडी येथे बीच महोत्सव अधिकारी ,कर्मऱ्यांना सोबत घेत यशस्वी केला. डीपीडीसी मधुन सर्वच आमदारांना मागणी केल्यास निधी मंजुर केला जातो. पण आलेला निधी खर्च करण्यासाठी आपल्या बुद्धीचा उपयोग मुख्याधिकाऱ्यांनी केला. आम. नाईक गेली सात वर्षे सत्तेत होते. मालवण नगरपालिकेच्या एका तरी प्रकल्पासाठी मोठा निधी वैभव नाईक निधी आणू शकलेत का? आमदार फक्त मंत्र्यांच्या दालनात फोटोशूट करण्यात मग्न होते, अशी टीका अमित इब्रामपुरकर यांनी केली आहे.

मालवण शहराची तुंबई झाली त्यावेळी मातोश्रीवर ‘मी निष्ठावानचा’ जपमाळ आमदार करत होते. मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे ओरोस, कुडाळचा अतिरिक्त पदभार आहे. नगरसेवक टक्केवारी घेत असल्याने तसेच बेनामी ठेकेदारी असल्याने कचऱ्याचे टेंडर दुसरी मागणी करून कोणी भरले नाही याची आम.वैभव नाईक यांना माहिती होती. शेवटी समोर पाऊस असल्याने मुख्याधिकाऱ्यांना नाशिकच्या ठेकेदाराला ठेका द्यावा लागला. स्वत:चे अपयश झाकण्यासाठीच वैभव नाईकांकडून मुख्याधिकारी यांना रस्त्यावर त्रास देण्याचे काम केले. प्रामाणिक अधिकाऱ्यांना स्वार्थासाठी भर रस्त्यावर आमदारांनी झापणे जिल्ह्याची संस्कृती नाही. एकीकडे महोत्सवाचे नियोजन केल्याबद्दल मुख्याधिकाऱ्यांचे कौतुक करायचे आणि दुसरीकडे शहरात पाणी तुंबल्याने अंगाशी येताच फैलावर घेण्याचे काम करत आहे, अशी टीकाही अमित इब्रामपुरकर यांनी केली.

आमदार नाईक भुयारी गटाराचा प्रश्न मार्गी लावू शकले नाहीत. कचऱ्यापासून वीजनिर्मिती पूर्णत्वास नेऊ शकले नाहीत तिथे आडारी डम्पिंग ग्राउंडचे दुषित पाणी रस्त्यावर येते. शहराला २४ तास वीज मिळणार अशा बाता मारून देऊळवाड्यातील वीज उपकेंद्राचे उद्घाटन केले. आज नागरिक सतत वीज खंडित होण्याने त्रस्त आहेत. शहरातील अनेक दिवे बंद आहेत. वीज समस्यांवर उपाय म्हणून भुमिगत वीज वाहिन्यांचे पुढे काय झाले ? तिलारीचे पाणी मालवण शहराबरोबरच देवबाग- तारकर्लीला नेणार अशी घोषणा केली. त्याचे पुढे काय झाले ? असे सवाल अमित इब्रामपूरकर यांनी उपस्थित केले आहे.

You cannot copy content of this page