गांजा बाळगल्या प्रकरणी संशयिताची पंधरा हजाराच्या जामीनवर मुक्तता

⚡सावंतवाडी,ता.१२-: कोलगाव-चाफेआळी येथे आपल्या भाड्याच्या घरात गांजा बाळगल्या प्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी नारायण गिरी याला आज येथील न्यायालयात हजर केले असता त्याची पंधरा हजाराच्या जामीनवर मुक्तता करण्यात आली.

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्याला सावंतवाडी पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेऊन अटक केली होती. तर आज त्याला न्यायालयात हजर केले असता जामिनावर मुक्तता करण्यात आली. संशयित आरोपीच्या वतीने कामी अ‍ॅड. परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page