Headlines

भटवाडी येथील लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय शाळेत दीपाली भालेकर यांच्या उपस्थितीत गणवेश वाटप

⚡सावंतवाडी ता.१२-: कै. श्रीम. लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय जि. प. शाळा भटवाडी सावंतवाडी नं 6 मध्ये समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत गणवेश वाटप नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीम अनिशा राणे, उच्च शिक्षण तज्ञ दिलीप भालेकर, उपाध्यक्षा श्रीम समीक्षा खोचरे सदस्य श्रीम गीता चव्हाण, श्रीम रेखा डंकी, श्रीम सारिका लाखे श्रीम पूजा लाखे, श्रीम पुनम लाखे, श्रीम सारिका भिसे, श्रीम सुरेखा भिसे, गौरी पास्ते, वर्षा साळुंखे, अनिता राम, बिंदू गौड, शिक्षिका श्रीमा गीता सुतार मॅडम, मुख्याध्यापिका श्रीम सायली लांबर उपस्थित होते.

नगरसेविका दिपाली भालेकर, शाळेच्या अध्यक्षा श्रीम अनिशा राणे, उच्च शिक्षण तज्ञ दिलीप भालेकर, मुख्याध्यापिका श्रीम सायली लांबर आदिनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम सायली लांबर व आभार शाळेच्या शिक्षिका श्रीम गीता सुतार यांनी मानले

You cannot copy content of this page