सुदैवाने चालक बचावला : मोटारीवरील ताबा सुटल्याने अपघात
बांदा/प्रतिनिधी
. भरधाव वेगात चालक मोबाईल बघण्यासाठी खाली वाकल्याने मोटार रस्त्याच्या कडेळ गटारात कोसळून अपघातग्रस्त झाली. सुदैवाने चालक बचावला. हा अपघात आज दुपारी मुंबई गोवा महामार्गवर सटमटवाडी टोल नाक्यानजीक घडला.
. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, चालक गोव्यातून बांद्याच्या दिशेने भरधावं वेगात येत होता. महामार्गांवर चालक अचलक मोबाईल बघण्यासाठी खाली वाकल्याने त्याचा मोटारीवरील ताबा सुटला. मोटार वेगाने रस्त्याच्या कडेला गटारात कोसळून अपघातग्रस्त झाली. स्थानिकांनी धाव घेत चालकाला बाहेर काढले. सुदैवाने त्याला मोठी दुखाप्त न होता किरकोळ खरचटले. अपघाताची नोंद बांदा पोलिसात नसल्याचे सांगण्यात आले.
