⚡देवगड ता.१२-:
देवगड येथे तालुका कृषी विभागामार्फत श्री पध्दतीने भात पिक लावणी प्रात्यक्षिक व शेतीविषयी मार्गदर्शन उपक्रम करण्यात आला.या उपक्रमात छत्रपती शिवाजी कृषी विद्यालय किर्लोस च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
ग्रामीण कृषी जागरुकता व औद्योगिक कार्यानुभव आणि महाराष्ट्र शासन तालुका कृषी विभाग देवगडयांच्या संयुक्त विद्ममाने हिंदळे भंडारवाडी येथील प्रगतशील शेतकरी सुनिल कुलकर्णी यांच्या शेती मध्ये” श्री “पध्दतीने भात पिक लागवड प्रात्यक्षिक घेण्यात आले.ग्रामीण कृषी जागरुकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमातर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस चे कृषीदूत ऋतुराज सावंत, प्रद्युम्न माईणकर,पंकज आंबेरकर, आत्माराम माळकर, प्रज्योत परब, सगीरी सुजीवराज मुलिन्ति लक्ष्मी किशोर रेड्डी,आत्मकुरि वसंतराज रेड्डी, आणि कृषी पर्यवेक्षक ए.पी.आपटे, कृषी सहायक श्रीम.व्ही.एस्. तिरवडे, यानी उपस्थित शेतकऱ्यांना पारंपरिक शेती पेक्षा “श्री” पध्दतीचे भातपिक लागवडीचे महत्त्व स्पष्ट करून सांगितले.
याउपक्रमात हिंदळे सरपंच स्वरा पारकर प्रगतशील व जेष्ठ शेतकरी वसंत कुलकर्णी ,वनिता कुलकर्णी व शेतकरी ग्रामस्थ सहभागी झाले होते.हिंदळे गावामध्ये अशाच पध्दतीने आणखी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कृषीदूत व कृषी विभाग देवगड याच्या मार्गदर्शनाखाली”श्री “पध्दतीने भातपिक लावणी चे प्रात्यक्षिके घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
फोटो- हिंदळे येथे श्री पध्दतीने भातपिकाचे लागवड प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करताना तालुका कृषी पर्यवेक्षक ए.पी आपटे. सोबत कृषी सहायक श्रीम. व्ही.एस. तिरवडे आणि कृषी महाविद्यालय किर्लोस चे कृषी दूत व शेतकरी बांधव.
