तालुकास्तरीय समन्वय समिती सभा तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

⚡देवगड ता.१२-: आंबा व इतर फळ बागायती – शेतकरी संघ देवगड तालुका कृषी अधिकारी देवगड आयोजित तालुकास्तरीय समन्वय समिती सभा तहसिलदार देवगड यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय येथे नुकती संपन्न झाली.

सदर सभेला अध्यक्ष विलास रूमडे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.
सदर सभेत हवामान आधारीत फळपीक विम्याबाबत विषय उपस्थित करण्यात आले. शेतकऱ्यांकडून फळ पीक संरक्षण म्हणून घेण्यात येणारा विमा हप्ता, आणि त्याबदल्यात विविध महसूल मंडलातील हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांना मिळणारा तुटपुंजा नुकसान मोबदला यात शासनाचे निकषाप्रमाणे तालुक्यात मिळणाऱ्या नुकसान भरपाईचा परतावा यात प्रचंड तफावत असल्याचे रुमडे यांनी निदर्शनास आणून दिले.
हवामानाच्या नोंदी नोंदविणारी उपकरणे ही मंडल विभागानुसार वेगवेगळ्या पद्धतीने नोंदी करतात त्यामुळे तफावत दिसून येत असल्यामुळे निकषावर सुधारणा सुचविल्या.त्यांचप्रमाणे विमा कालावधी १ ऑक्टोंबर ते ६ जून असा गृहीत धरावा अशीही दुरूस्ती सुचविली.संबंधित विमा कंपन्यानी तालुका कृषि कार्यालयातील व शेतकरी यांचे प्रतिनिधी समवेत हवामान बदलातील नोंदी आणि त्याचे परिमाण त्या त्या क्षेत्रात जावून नोंदवाव्या व त्याचा अहवाल शासनास पाठवावा.सर्व शेतकऱ्यांचा सर्व मंडळ विभागात विमा हप्ता प्रति हेक्टरी जमीन क्षेत्राप्रमाणे समान कपात केला जातो तर प्रत्येक विभागात नुकसान परतावा समान मिळाला पाहिजे त्यातही तफावत नसावी. या वर्षी आंबा पिकाच्याबाबतीत अवकाळी पाऊस, प्रचंड थंडी व तापमान व दुसऱ्या टप्प्यात फळ माशीचा मोठया प्रमाणात झालेला प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून त्याचा अहवाल शासनाकडे त्वरित पाठविणेत यावा असेही सुचविणेत आले आहे. दरमहा समन्वय समितीची सभा घेऊन शेतकऱ्यांच्या समस्यांचा आढावा घ्यावा. अशा सुचना समन्वय समितीच्या सभेत विलास रूमडे यांनी मांडल्या .
विशेष बाब म्हणजे तालुक्यातील शेतकरी संघाचा प्रतिनिधी म्हणून अन्य विविध विषय मांडून शेतकऱ्याच्या समस्याकडे गाभीर्याने व सहानुभूतीपूर्वक तालुका कृषी अधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी विनंती केली. त्याच प्रमाणे अध्यक्ष मारुती कांबळे यांनी देवगड तालुक्यातील सर्व नागरिकांच्या समस्याकडे वैयक्तीत लक्ष घालून काम करत असल्याने त्यांचे विशेष आभार मानले.

You cannot copy content of this page