⚡बांदा ता.१२-: बांदा-असनीये रस्त्यावर डेगवे -मोयझरवाडी येथे झाड उन्मळून पडल्याने येथील वाहतूक २ तास बंद होती. तांबूळी ग्रामस्थांनी झाड बाजूला करून सायंकाळी उशिरा वाहतूक सुरळीत केली.
आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास मूसळधार पावसाने झाड अचानक रस्त्यावर कोसळले. सुदैवाने वाहतूक नसल्याने मोठी दुर्घटना टळली. झाडासोबत माती व दगड रस्त्यावर कोसळले. तांबोळी ग्रामस्थांनी दोन तासात कोसळलेले झाड बाजूला केले तसेच माती व दगड बाजूला करून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.
