पर्यटकाकडून एस्टी ड्रायव्हरला मारहाण

आंबोली घाटातील प्रकार; “त्या” पर्यटकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

⚡सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडी नरसोबावाडी बस ही आंबोली मार्गे जात असताना आंबोली येथे एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पर्यटकांकडून त्या बसच्या चालकाला गाडीतून खाली उतरवून बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत तो चालक गंभीर जख्मी झाला असून, त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

त्याच्याविरोधात सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, हा प्रकार आज सायंकाळी घडला आहे.

You cannot copy content of this page