⚡मालवण ता.१२-: मालवण शहरात प्लास्टिक कचऱ्याची समस्या वाढत असून प्लास्टिक वापराच्या दुष्परिणामांबाबत व प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच मालवण शहर प्लास्टिक मुक्त शहर व्हावे, या हेतूने मालवण नगरपरिषदेने आयोजित केलेल्या प्लास्टिक मुक्त मालवण शहर (इको ब्रिक्स) या स्पर्धेस दि. १८ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या स्पर्धेत मालवण शहर हद्दीतील नागरिक, विद्यार्थी, सेवाभावी संस्था, शिक्षण संस्था, नागरिकांचा समूह, महिला बचत गट, व्यावसायिक, स्टार्ट अप्स, रेसिडेन्सी असे सहभाग घेऊ शकतात. या स्पर्धेत प्लास्टिक पिशव्या, चॉकलेट व खाद्य पदार्थांची प्लास्टिक आवरणे आदी प्लास्टिक कचरा एक लिटरच्या प्लास्टिक बॉटल मध्ये भरून १८ जुलै पर्यंत मालवण नगरपरिषदेकडे जमा करायच्या आहेत. एक लिटरची एक बॉटल म्हणजे एक इकोब्रिक्स असणार असून स्पर्धकाने अशा किमान पाच बॉटल भरून देणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त बॉटल देणाऱ्या पहिल्या तीन क्रमाकांच्या विजेत्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी मंदार केळुसकर – 9373986355, प्रसाद भुते – 8888391426 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले आहे.
