⚡मालवण ता.१२-: मालवण येथील सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयात राष्ट्रीय महा संवर्धक अर्थात राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मच्छीमार सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींना सहाय्यक मत्स्य आयुक्त रवींद्र मालवणकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी मच्छीमार सहकारी संस्था जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी, सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर, अस्लेषा गोळवणकर, विजय देवकर, प्रशिक्षण अधिकारी प्रदीप सुर्वे, मच्छीमार सहकारी अध्यक्ष विकी चोपडेकर, रामेश्वर सोसायटीचे हनुमंत झाड, राजकोट सोसायटीचे गणेश गावकर, सिंधुदुर्ग मच्छीमार सोसायटीचे मंडलिक, रवींद्र रेवंडकर, लाभार्थी दिक्षा ढोके आदी उपस्थित होते. यावेळी मच्छीमारांनी गोड्या पाण्यातील मासेमारीविषयी अनुभव कथन केले.
