⚡मालवण ता.१२-: प.पू. सद्गुरू सदानंद माऊली महाराज संप्रदायातर्फे गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त दि. १३ जुलै रोजी वायरीबांध येथील दत्त मंदिरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सकाळी ९ वाजता जगद्गुरू श्री दत्त महाराजांच्या निर्गुण पादुकांवर लघुरुद्राभिषेक, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. सांप्रदायिक भजने आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्वानी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वायरी येथे गुरुपौर्णिमा उत्सव
