तरुण जखमी : हुल्लडबाज पर्यटकांवर आळा घालण्याची मागणी
⚡आंबोली,ता.११-: पर्यटनासाठी आलेल्या युवकाचे आंबोली घाटात आयशर टेम्पो ला मोटर सायकल धडकून अपघात झाला.ही घटना आज दुपारी घडली.
आंबोलीत आज देखील पर्यटकांची मोठी गर्दी होती.
कर्नाटक ,बेळगाव आणि कोल्हापूर पच्छिम महाराष्ट्रातील पर्यटकांची आज गर्दी जास्त होती.
घाटात गोवा पासिंग च्या आयशर टेम्पो ला दर्शन सतीश देसाई,वय २३,उचगाव, शिनोळी येथील दुचाकी स्वार धडकून जखमी झाला त्यानंतर त्याच्या मित्रांनी आरोग्य केंद्रात दाखल केले.१०८ ने सावंतवाडीत नेण्यात आले.
आंबोलीत आज पर्यटकांची हुल्लडबाजी खूप होती.काही पर्यटक गाड्यांवर बसून तर काही मोटर सायकल वाले हुल्लड बाजी करत होते.रस्त्यावर दंगा घालत होते.पोलिसांनी पेट्रोलिंग करणे आवश्यक आहे.ग्रामस्थ देखील याबाबत नाराजी वेक्त करीत आहेत.शांतता पूर्ण पर्यटक असतील तरच आंबोलीत कौटुंबिक पर्यटन वाढेल आणि सुरक्षितता राहण्यासाठी पोलिसांनी पेट्रोलिंग करणे आवश्यक आहे असे मत वेक्तं होत आहे
