संदेश पारकर यांच्या वाढदिवासानिमित्त फ़ुटबाँल स्पर्धेचा शुभारंभ

विविध  सामाजिक,शैक्षणिक उपक्रमांनी होणार वाढदिवस साजरा

⚡कणकवली ता.११-: शिवसेनेचे नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवासा निमित्त विद्यामंदिर हायस्कुल  पटांगणात फ़ुटबाँल स्पर्धेचे  उदघाटन  नगरसेवक रुपेश  नार्वेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.  

संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. फ़ुटबाँल स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. कणकवली तालुक्यातील १५ संघ सहभागी झाले आहेत. १४ जुलै रोजी संदेश पारकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक, शैक्षणिक तसेच रक्तदान शिबीर असे समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

संदेश पारकर मित्रमंडळाकडून  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे  या स्पर्धाना युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. यावेळी  युवासेना कणकवली शहरप्रमुख आदित्य सापळे,गौरव हर्णे,वैभव मालंडकर. अमित मयेकर. जय शेट्ये. संतोष पुजारे,चंदन पाटील,कौशिक पारकर,अक्षय भोगटे आदी उपस्थित होते. या स्पर्धेतील  विजेत्या संघास रोख रक्कम,चषक,वैयक्तिक बक्षीसे देऊन  वाढदिवसादिनी मान्यवरच्या हस्ते गौरविण्यात  येणार आहे.

You cannot copy content of this page