जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलिपे यांची माहिती
⚡ओरोस ता.११-: सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसंख्या वाढीचा दर सुद्धा निगेटिव्ह आहे. तसेच लोकसंख्येची घनता सुद्धा या जिल्ह्यात कमी आहे. ७.०४ टक्के एवढे जिल्ह्याचे जन्म प्रमाण आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलिपे यांनी लोकसंख्या दिनाच्या पार्श्वभमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून डॉ खलिपे यांनी आपल्या दालनात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ संदेश कांबळे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ रमेश तर्कसकर यांच्यासह जिल्हास्तरीय अधिकारी, तालुका अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ खलिपे यांनी, जिल्ह्यातील लोकसंख्येबाबत विस्तृत माहिती दिली. पुढे बोलताना त्यांनी २०११ च्या तुलनेत जिल्ह्याची लोकसंख्या २.३० टक्के एवढी मायनस आहे. राज्याची लोकसंख्या घनता ३६५ असताना जिल्ह्याची घनता १६३ एवढी आहे, असे सांगितले.
