हडी वागेश्र्वर मंदिरनजिक सापडला तस्कर जातीचा साप

नैसर्गिक अधिवासात सोडले

मालवण दि प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील हडी येथील नागेश्वर मंदिर नजीक रहाणाऱ्या प्राची मेस्त्री यांच्या घरालगत आढळून आलेल्या पहाडी तस्कर या प्रजातीतील सापाला कांदळगाव येथील सर्पमित्र स्वप्नील परुळेकर यांनी पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.

पहाडी तस्कर हा भारतीय उपखंडात आढळणारा अतिशय निरुपद्रवी बिनविषारी साप आहे. इंग्रजीत याला ट्रिकेट अथवा साधा म्हणतात. अतिशय शांत स्वभावाचा हा साप हाताळायला अतिशय सोपा असतो. हा लांबीला साधारणपणे १/२ ते १ मीटर पर्यंत असतो. व जाडीला १ इंचापर्यंत असतो. अंगावर पट्टे असतात व पट्टे सुरेख बुद्धीबळातील पटासारख्या छोट्या काळ्या पांढऱ्या चौकोनांनी भरलेले असतात. हा साप मुख्यतः श्रीलंका आणि पश्चिम भारतात, दक्षिण भारतात आढळतो. हा साप महाराष्ट्रात विपुल प्रमाणात आढळतो. छोटी जंगले, मानवी वस्त्यातील आडगळीच्या जागा ह्या त्याच्या आवडत्या जागा असल्याची माहिती सर्पमित्र स्वप्नील परुळेकर यांनी दिली. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सरपटणारे कोणतेही जनावर आढळल्यास त्यास न मारता सर्पमित्र याना बोलावण्याचे आवाहन परुळेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page