विद्या विहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस मध्ये वह्या वाटप
बांदा : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील मुले बहुतांश मध्यमवर्गीय आहेत. शेतकरी वर्गातील मुलांचा शैक्षणिक आलेख कायम वाढून आजचा विद्यार्थी उद्या जिल्ह्याचा एक उच्च अधिकारी बनला पाहिजे. यासाठी शिक्षणात येणाऱ्या आर्थिक अडचणींचा भार पालकांवर पडू नये अशा तीन होतकरू विद्यार्थ्यांचे पालकत्व आम्ही स्वीकारून त्यांच्या वर्षभरातील सर्व शैक्षणिक खर्चाचा भार उचलणार असल्याचे प्रतिपादन बाळा परब मित्रमंडळाचे विजय सोनावळे व संदीप कासार यांनी केले.
विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस मधील विद्यार्थ्यांना बाळा परब व विजय सोनावळे मित्रमंडळ मुंबई यांच्यातर्फे सलग चौथ्या वर्षी वह्या वाटप कार्यक्रम करण्यात आला. व्यासपीठावर मित्रमंडळाचे विजय सोनावळे, आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नीलेश परब, उपाध्यक्ष संजू पांगम, खजिनदार बाळा मोरजकर, मित्रमंडळाचे सोपान पवार, संदीप कासार, अभय गावकर, किशोर गावकर, महेश कदम, पाडलोस सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, माजी विद्यार्थिनी तन्वी परब, प्रभारी मुख्याध्यापक सदाशिव धूपकर आदी उपस्थित होते.
शेतकरी वर्गातील मुलांच्या बुद्धिमत्तेला अधिक वाव मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी मुंबईसारख्या ठिकाणांहून गावी येत होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचे दातृत्व मित्रमंडळ करत आहे. कोरोना काळातही बाळा परब व विजय सोनवळे मित्रमंडळाने विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला. त्यामुळे विद्यार्थी शंभर टक्के गुण मिळवत आपले आभार मानतील असा विश्वास आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नीलेश परब यांनी मान्यवरांना दिला. संजू पांगम यांनीही विचार व्यक्त करत गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक नीलेश देऊलकर यांनी केले. प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक सदाशिव धुपकर यांनी तर सांस्कृतिक विभाग प्रमुख सुषमा मांजरेकर यांनी आभार मानले.
