संजू परब रमले मूर्ती कोरीव कामात : अन सवंतवाडीकरांनी पहिला राजकारणा पलीकडचा माणूस
⚡सावंतवाडी ता.११-: माणसाला विविध प्रकारचे छंद असतात. काही काही माणसे आपला हा छंद जोपासतात. असाच एक आपला एक मूर्तिकलेचा छंद जोपासणारी व्यक्ती म्हणजे माजी नगराध्यक्ष संजू परब. सावंतवाडी भटवाडी येथील गणपती शाळेत गणेश मूर्तीला कोरीव काम करून त्यांनी आपला छंद जोपासला.
माजी नगराध्यक्ष संजू परब मूळ मडुरा येथील आहेत सध्या ते नगराध्यक्ष नसले तरी ते राजकारणात सक्रीय असतात. ते शेतकरी असून आपल्या फावल्या वेळात ते शेतीही करतात. तसेच लहानपणापासूनच त्यांना मूर्तीकामाची आवड होती. सावंतवाडी भटवाडी येथील गणपती शाळेत भेट देण्यासाठी गेले असता तेथील मुर्त्या पाहून त्यांचा छंद स्वस्त बसू देईया, त्यांनी ब्रश घेऊन मूर्तिकामास सुरुवात केली
