कामगार कल्याण केंद्र कणकवली
येथे जागतिक लोकसंख्या दिन साजरा

⚡कणकवली ता.११-: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय चिपळूण आयोजित कामगार कल्याण केंद्र कणकवली येथे जागतिक लोकसंख्या दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात एक अपत्या नंतर शस्त्रक्रिया केलेल्या किंवा दोन मुलींवर शस्त्रक्रिया केलेल्या अशा पाच सुखी कामगार जोडप्याच्या सत्कार कार्यक्रमाचे कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष समिर नलावडे, प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण गिरीश भगत व एल.आय.सी.कणकवली शाखाप्रबंधक सतेजा बोवलेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सत्कार मूर्ती संतोष शामसुंदर बोडेकर व स्नेहा संतोष बोडेकर (रा.प.म. विभागीय कार्यशाळा कणकवली) यांनी (दोन मुलींवर शस्त्रक्रिया ) , विनया विनय शिरोडकर व विनय सूर्यकांत शिरोडकर (साऊथ कोकण इंडस्ट्रीज काजू कारखाना मालवण )यांनी (दोन मुलींवर शस्त्रक्रिया), दिपीका दशरथ परब व दशरथ यशवंत परब (अमृता काजू फॅक्टरी वेंगुर्ले )यांनी (एका मुलावरती शस्त्रक्रिया),प्रदिप यशवंत मिठबांवकर व प्रतिक्षा प्रदिप मिठबांवकर (रा.प.म.विजयदुर्ग )यांनी (दोन मुलींवर शस्त्रक्रिया),पांडुरंग भिवा हुमरसकर व सिध्दी पांडुरंग हुमरसकर (सि.जि.म.स.बॅक )यांनी (दोन मुलींवर शस्त्रक्रिया )केली आहे. इत्यादी सुखी जोडप्याच्या सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केंद्र संचालक संतोष नेवरेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी सुप्रीया मोरये केंद्र महिला कल्याण सहाय्यीका तसेच रूपाली दाभोलकर,सविता देऊलकर,श्वेता नाईक आरोसकर यांनी सहकार्य केले.

You cannot copy content of this page