चार तास रोखली गेली होती वाहतूक
ग्रामस्थांत नाराजी
⚡आंबोली,ता.१०-: आंबोली वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमुळे आंबोली संडे हाऊसफुल गर्दी झाली.घाटात धबधब्याकडे पर्यटकांमुळे आंबोली रस्ता ट्रॅफिक जॅम मध्ये तब्बल ४ तास अडकला.१२ ची दुपारची बस सावंतवाडी तून आंबोलीत ६ वाजता आली.यामुळे वेंगुर्ला बेळगाव रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.त्यामुळे ग्रामस्थांनीही नाराजी वेक्त केली.
आंबोलीत आजच्या रविवारच्या दिवशी नियोजन बिगडल्याचे चित्र होते.घाटात तब्बल ४ तास वाहतूक कोंडी झाली.त्यामुळे अनेक प्रवासी अडकून पडले.बरेचसे पर्यटक गाड्या रस्त्यालगत लावून पर्यटनासाठी गेल्याने वाहतूक कोंडी झाली.त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला.एस टी बस तब्बल ४ तास उशिरा धावत होत्या.सर्वच पर्यटन स्थळावर मोठी गर्दी आणि वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.शनिवारी सर्व राहण्याची हॉटेल्स फुल्ल होती रविवारी मोठी गर्दी आंबोलीच्या रस्त्यावर गाड्या देखील मोठ्या प्रमाणात होत्या.कर्नाटक,कोल्हापूर,बेळगाव,गोवा,कोकण,सांगली सर्व भागातून पर्यटकांची गर्दी होती.मात्र वाहतूक कोंडी मुळे नाराजी वेक्त केली.
