⚡कणकवली ता.१०-: वैभववाडी तालुक्यातील तिथवली येथील बौद्ध विकास मंडळ तिथवली व केळवली येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष बापू तांबे यांच्या सौजन्याने या गावातील १० वी/१२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व पंचक्रोशितील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान आणि शैक्षणिक वस्तूंचे वाटप कार्यक्रम परिश्रम बुद्धविहार तिथवली येथे झाला.
सुधीर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सम्पन्न झालेल्या या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते सुभाष बापू तांबे,निवृत्त पोलिस कॉन्स्टेबल गुणाजी तांबे,वैभववाडी तालुका माजी सभापती बाळा हरयाण,बिल्डर्स विजय तावडे,तिथवली सरपंच सुरेश हरयाण,माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष संतोष हरयाण,दिर्बiदेवी सोसायटी चेअरमन ब्रम्हा हरयाण,ग्रा प सदस्य रोहीण कुडाळकर,आरोग्य सेवक गौर खेडे,महादेव हरयाण, विश्वनाथ तांबे,प्रदीप पवार,निलेश तांबे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष तांबे यांनी त्यांचे दिवंगत वडील कालकथीत बापू भागोजी तांबे यांच्या स्मृती प्रित्यर्थ पंचक्रोशीतील १० गरीब होतकरू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी ११००/- रुपये शिष्यवृत्ती,वह्या आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.तर बौद्ध विकास मंडळ तिथवली च्या वतीने १०वी /१२वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.तसेच तिथवली गावातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते प्रदीप तांबे,मोतीचरण तांबे,सतीश तांबे,गंगाराम तांबे यांनी सहकार्य केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार तिथवली बौद्ध विकास मंडळाचे सचिव अजय तांबे यांनी मानले.
