⚡बांदा ता.१०-: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीत दरवर्षी आषाढी एकादशीला मोठी यात्रा भरते ठिकाणी देशभरातून संताचा मेळा गोळा होऊन अवघी पंढरी दूमदूमून जाते. याच आषाढी वारीचे औचित्य साधून उपक्रमशील शाळा म्हणून ख्याती असलेल्या जिल्हा परिषद बांदा नं 1 केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशीही बांदा केंद्र शाळेपासून विठ्ठल मंदिरापर्यंत वारकरी दिंडी काढली .
विठ्ठल-रूक्मीणी,विविध संत,वारकरी यांच्या वेशभूषा परिधान करून कट्टा कॉर्नर,गांधी चौक तसेच बांदा बाजारपेठेतून टाळ,लेझीम ,ढोल या जयघोषात ही दिंडी काढण्यात आली.या दिंडीत नैतिक मोरजकर याने साकारलेली विठ्ठलाची वेशभूषा तर शुभ्रा तेली हिनी साकारलेली रूक्मीणीची भूमिका लक्षवेधी ठरली या दिंडीत लौकीक तळवडेकर याने सुंदर अभंग गायनाने वातावरण भक्तीमय बनवले.
चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या या वारकरी दिंडीचे विठ्ठल मंदिर देवस्थान कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात आले व विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने राबविण्यात आलेली ही वारकरी पायी दींडी यशस्वी करणेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, ज्येष्ठ शिक्षिका सरोज नाईक, पदवीधर शिक्षिका उर्मिला मोर्ये, रंगनाथ परब ,जे.डी.पाटील, प्रशांत पवार, गोपाळ साबळे याचबरोबर पालक व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.गेली दोन वर्षे कोरोनामुळे बंद असलेलया शाळांमधून सहशालेय उपक्रम प्रत्यक्ष राबविण्यात येत असल्याने शाळांमधील वातावरण चैतन्यमय बनत आहे.
