मळगाव येथील शारदा विद्यालय शाळेत राबविण्यात आला रानभाजी परिचय उपक्रम

विविध रानभाज्यांची करून देण्यात आली ओळख

⚡सावंतवाडी ता.०९सहदेव राऊळ-: मळगाव येथील शारदा विद्यालय रस्तावाडी या जिल्हा परिषद शाळेत रानभाजी परिचय उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मुलांना विविध प्रकारच्या रानभाज्यांची ओळख करून देण्यात आली. या उपक्रमाला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या उपक्रमांतर्गत शिक्षकांनी परिसरात उगवत असलेल्या अनेक रानभाज्यांची मांडणी केली. प्रत्येक रानभाजीला तीच नाव देत त्याविषयीं सविस्तर माहिती मुलांना दिली. शेवगा. पेवा, एकपान, अळू, तेर, कुड्याच्या शेंगा, टायकाळा, दिंडा, घोटवेल, कुरडू, सुरण आदी रानभाज्यांची माहिती व पौष्टिकत्व सांगण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शिक्षिका अस्मिता गोवेकर, शिक्षिका सीमा सावंत व विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page