आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात 11 रोजी काव्यवाचन

⚡वैभववाडी ता.०९-: वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र, गझलकार कै. मधुसूदन नानिवडेकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त सोमवार दि. 11 जुलै रोजी सकाळी 10 वाजता काव्यवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था यांच्या वतीने येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी ज्येष्ठ कवी, गझलकार, तालुक्यातील नवोदित कवी, ग्रामस्थ व मधुसूदन नानिवडेकर प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन शिक्षण संस्थेचे स्थानिक समिती सचिव प्रमोद रावराणे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page