छत्रपतींच्या पुतळ्याचे रखडलेले स्थलांतर रयतेचे राज्य येताच लागले मार्गी समीर नलावडे

लोकसहभागातून नव्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे होणार सुशोभीकरण

⚡कणकवली ता.०९-: गेली तीन वर्षे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतर विषय गाजत होता. खऱ्या अर्थाने काल त्या प्रश्नाला दिशा मिळाली.राज्यातील नवीन आलेले रयतेचे शासन व आ.नितेश राणे यांचे आभार मानतो. नगरपंचायत प्रशासनाने महत्वपुर्ण कामगिरी बजावली आहे.त्यामुळेच तीन वर्षे छत्रपतींच्या पुतळ्याचे रखडलेले स्थलांतर रयतेचे राज्य येताच मार्गी लागले,अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.शिवाजी महाराज यांचा जुना पुतळा नगरपंचायत सभागृहात विधिवत पूजा करुन ठेवण्यात आला आहे.

कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,नगरसेवक अभिजित मुसळे,किशोर राणे, अजय गांगण आदी मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे स्थलांतर हा मुद्दा घेऊन सातत्याने आम्ही काम करत होतो.त्यासाठी मी पुढाकार घेत सर्वपक्षीय लोकांना घेऊन एक बैठक घेतली होती.माजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी यांना स्थलांतर प्रस्ताव दिला होता.नगरपंचायतीने दिलेला प्रस्ताव ५०० स्क्वेअर फूटचा होता.त्यात सुसज्ज छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा लोकसहभागातून उभारण्यात येणार आहे.त्यासाठी शिवाजी चौक मित्रमंडळ,सकल मराठा समाज,शिवप्रेमी, शिवसेना ,भाजप,कॉग्रेस, राष्ट्रवादी व मनसे सर्व पक्षाचे लोकांची मदत घेऊन पुतळ्याचे सुशोभीकरण करायचे आहेत.त्यासाठी नव्याने प्लॅनही नगरपंचायतने बनवलं आहे.मदत देणाऱ्या लोकांना मंडळाची रितसर पावती देण्यात येईल. मी माझ्या सहा महिन्यांच्या मानधनाचा ९० हजारांचा धनादेश देणार असल्याचे समीर नलावडे यांनी जाहीर केले.तसेच आर्थिक मदतीसाठी नगरपंचायत पदाधिकारी व शिवाजी चौक मित्रमंडळ ,मराठा समाज नेते एस.टी.सावंत यांच्याशी संपर्क साधावा ,असे आवाहन त्यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतर कार्यांत अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले,त्यामुळे अवघ्या तीन तासात तीन वर्षांचे रखडलेला प्रश्न मार्गी लागला आहे.आजचा आमच्यासाठी सोनेरी दिवस आला आहे.जनता व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी फोन करत आभार मानत आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतर करताना मुख्याधिकारी व आम्ही छत्रपतीचे पूजन करत पुष्पहार घालण्यात आला.पावित्र्य राखून पुतळा स्थलांतर करण्यात आला.सभागृहात पुतळा ठेवून पुन्हा पुष्पहार घालण्यात आला.पूजन करण्यात आलेले आहे.पुतळा स्थलांतर करण्यासाठी शिवाजी चौक मित्रमंडळ,तसेच मराठा समाजाने पत्र दिले होते.त्यानुसार पुतळा सभागृहात आणून ठेवला आहे.शहराच्या दृष्टीने सन्मानाने पुन्हा शिवाजी महाराज यांचा पुतळा नागरिकांना दिसेल,असा विश्वास समीर नलावडे यांनी व्यक्त केला.

पुतळ्याचे रात्री स्थलांतर केलं,कारण काही अनुसूचित प्रकार होऊ नये,वाहतूक कोंडी होऊ नये.प्रशासनाला अधिकार आहे,त्यामुळे यंत्रणा वापरली आहे.छत्रपतीच्या पुतळ्याला न्याय दिला.राज्यातील शासन आपलं आवश्यक असते,त्यात आम. नितेश राणे यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

उपनगराध्यक्ष बंडू हर्णे म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते.१८ पकड जाती सोबत घेत स्वराज्य स्थापन केले होते.काहीजणांनी स्मारक व्हावं,अशी न होणारी मागणी केली होती. अज्ञात लोकांनी पुतळा बसवला त्यामुळे हा पुतळा हटविण्यास मदत झाली.प्रशासनाची सर्व्हिस रस्त्यावर असलेला पुतळा हटविण्यास मदत झाली.पुढील चर्चेनुसार संबंधित संघटनेला हा पुतळा ताब्यात देण्यात येईल.रात्रीस खेळ पूर्वी झुगार व पट चालायचे.आता चांगली कामे करण्यासाठी रात्रीस खेळ चाले,असा टोला विरोधकांना लगावला.

You cannot copy content of this page