⚡कणकवली ता.०९-: खारेपाटण येथील युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सुकांत वरूनकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या दातृत्व भावनेतून जि. प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ ला २५ प्लास्टिक खुर्च्या वस्तुरुप भेट म्हणून दिल्या.
जि प केंद्र शाळा खारेपाटण येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला शिवसेना कणकवली उपतालुका प्रमुख महेश कोळसुलकर,सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव,गुरुप्रसाद शिंदे,पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष सौ कीर्ती शेट्ये,केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल, शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर,प्रज्योत मोहिरे,अक्षय जोशी,अमोल कांबळी आदी मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते सुकांत वरूनकर यांनी मित्र कै.प्रदीप ईसवलकर यांच्या स्मरणार्थ जि प केंद्र शाळा खारेपाटण ला २५ प्लस्टिक खुर्च्या भेट म्हणून दिल्या.खुर्च्या शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांचेकडे शाळेत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सुपूर्द करण्यात आल्या.तर शाळेच्या विद्यार्थ्यांना पेन चॉकलेट व खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी मंगेश गुरव,महेश कोळसुलकर,केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल आदींनी आपली मनोगते व्यक्त केली.तर खारेपाटण केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी मार्गदर्शन करताना संगीतले की, सुकांत वरूनकर यांच्या कडून असेच सामाजिक कार्य घडो अशा शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेचे पदवीधर शिक्षक संजय राऊळ, श्रीम अर्चना तळगावकर,सहायक शिक्षक श्रीम.स्मिता कोरगावकर, रेखा लांघी,अलका मोरे,रुपाली पारकर,यांनी सहकार्य केले.संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार शाळेचे मुख्यध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी मानले.
