मंत्रीपदाच्या आमिषाला काहीजण बळी पडले

आमदार वैभव नाईक यांची दीपक केसरकर यांचे नाव न घेता टीका

⚡सावंतवाडी ता.०९-: महाविकास आघाडी सरकारमध्ये काही आमदारांना मंत्रीपद मिळाले नाही आशा आमदारांना भाजपने रणनीती हाकून ज्यांना मंत्रीपद मिळाली नाही अशांना संपर्क साधून त्यांना आमिष दाखवून त्यांना आपल्या पदरात ओढण्याचं काम केलं “त्या” अमिषाला काहीजण बळी पडली अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी दीपक केसरकर यांचे नाव न घेता केली आहे.

यावेळी बोलताना वैभव नाईक म्हणाले की शिवसेनेच्या विरोधात आज जे जे गेले त्याना केव्हाच उभारी घेत नाही आली हा शिवसेनेचा इतिहास आहे त्यामुळे कोणी ही न डगमगता आणखीन जोमाने काम करून शिवसेना आधिक बळकट करून उद्धव ठाकेरच्या पाठीशी उभे राहू असा विश्वास ही त्यांनी पदाधिकाऱ्यांशी बोलताना व्यक्त केला तसेच येणाऱ्या २७ जुलैला उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होत असून त्या निमित्ताने आपण विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करूया असेही कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केले.

You cannot copy content of this page