वीर शंकरराव पेंढारकर सर व खारेपाटण शिक्षण प्रसारक मंडळ गौरव गीत लोकार्पण

⚡कणकवली ता.०९-: खारेपाटण येथे शेठ नाविनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूलच्या कै.चंद्रकांत परिसा रायबागकर सभागृहात वीर शंकरराव पेंढारकर सर व खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ गौरव गीत लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत व खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला.

या गौरव गीत लोकार्पण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध ज्येष्ठ नाटककार वस्त्रहरण नाटकाचे लेखक, दिग्दर्शक श्री गंगाराम गवाणकर व संतोष रानडे उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे , खजिनदार संदेश धुमाळे,खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थेचे सहसचिव डॉ. ए.डी.कांबळे , संचालक रघुनाथ राणे, विजय देसाई,राजेंद्र वरूणकर , राजेश वारंगे.तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सानप आदी मान्यवर उपस्थित होते.
गौरव गीत लोकार्पणानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सानप यांनी प्रस्तावनेमध्ये गौरव गीत निर्मिती मागची भावना स्पष्ट केली.
यावेळी हे गौरव गीत तयार करताना ज्यांचे सहकार्य लाभले त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्यामध्ये या गौरव गीताचे गीतकार प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सानप , संगीतकार व प्रशालेचे संगीत शिक्षक संदीप पेंडूरकर , संगीत संयोजक मितेश चिंदरकर, शब्द संयोजक म्हणून प्रशालेतील सहाय्यक शिक्षक लक्ष्मीकांत हरयाण व सचिन शेटे यांचा समावेश होता
.आपल्या भाषणात वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांनी आपण खारेपाटण हायस्कूलच्या संगीत विभागाने सादर केलेल्या कार्यक्रमाने व संस्थेच्या गौरवगीताने भारावून गेल्याचे सांगितले. . प्रमुख पाहुणे संतोष रानडे यांनी आपल्या भाषणात शाळेच्या प्रगती विषयी गौरवोद्गार काढले . आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी गौरव गीताच्या निर्मिती मागे सर्वसामान्य माजी विद्यार्थ्यांपर्यंत शाळा पोहोचली पाहिजे हा उद्देश आहे असे सांगितले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील शिक्षक सचिन शेट्ये यांनी केले व आभार प्रदर्शन सौ. कुलकर्णी यांनी केले.

You cannot copy content of this page