भविष्यातील सर्व निवडणुका जिंकू;पदाधिकारी बैठकीत तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांचा विश्वास
⚡सावंतवाडी ता.०९-: दिपक केसरकर गेले म्हणून शिवसैनिकांना काय फरक पडत नाही. शिवसेना आहे तशी राहणार त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही सर्व निवडणुका जिंकू असा विश्वास तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांन समोर व्यक्त केला आहे. आज सावंतवाडीत शिवसैनिक पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती यावेळी राऊळ बोलत होते.
तसेच ते बोलताना पुढे राऊळ म्हणाले की आज गावात जरी आम्ही गेलो तरी केसरकर समर्थक सांगतात आम्ही केसरकरांन सोबत नाय त्यामुळे दिपक केसरकर आसलेला रोष हा दिसून आला आहे.त्यामुळे केसरकर गेले शिवेसना कुठे ही कमी पडणार नसून उलट आणखीन जोमाने काम करून सर्व निवडणुकांमध्ये यश मिळू असा विश्वास यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केला.
