माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांच्या वाढदिनी ११ रोजी उपक्रम

महिलांसाठी केक बनविणे प्रशिक्षणाचे आयोजन

मालवण (प्रतिनिधी)

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी मालवण व जनशिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्यावतीने महिलांसाठी मोफत केक बनविणे प्रशिक्षण सोमवार दि. ११ जुलै रोजी दुपारी ३ वाजता मालवण दैवज्ञ भवन येथे आयोजित करण्यात आले आहे

यामध्ये विविध प्रकारचे केक तयार करणे, केकचा बेस व आयसिंग करणे शिकवण्यात येणार आहे. ज्या महिलांना या प्रशिक्षणात सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी भाजप महिला शहराध्यक्ष सौ.अन्वेषा आचरेकर (९४०४३४४३२२) तसेच सौ. ममता वराडकर (४२०८४५४९७५), सौ. पुजा करलकर (७७४४९७२१११), सौ. पूजा सरकारे, सौ. महानंदा खानोलकर, सौ ममता वेर्लेकर, सौ. दिव्या कोचरेकर, सौ. गावकर तसेच भाजपा शहर कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. करावा. यावेळी सर्व सहभागी महिलांना जन शिक्षण संस्था सिंधुदुर्गचे तर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page