बांदा गडगेवाडी रस्त्याची झाडी ग्रामस्थांनी श्रमदानातून तोडली

बांदा
बांदा गडगेवाडी येथील जाणाऱ्या रस्त्यावर वाढलेली झाडेझुडपे तेथील ग्रामस्थांनी श्रमदानातून साफसफाई करत बाजूला केली. वाहनचालकांना या झाडेझुडपे असल्याने वाहन चालवताना कसरत करावी लागत होती.

समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना याचा त्रास वाहनचालकांना होत होता. आज येथील गडगेवाडी ग्रामस्थांनी एकत्र येत याची साफसफाई करत रस्ता वाहनचालकांना मोकळा केला. या साफसफाई मोहीमेत रत्नाकर आगलावे, ज्ञानेश्वर सावंत, प्रसाद गाड, अमोल गाड, सत्तू सावंत, रंजन आंबेकर, सदाशिव सवित, रुपेश, सावंत,पांडुरंग आगलावे,अमित आगलावे,बाळू सावंत मोर्ये,सदाशिव सावंत, मकरंद तोरस्कर आदि सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page