विठ्ठलाची प्रतिकृती बल्बमध्ये साकारली

चित्रकार समीर चांदरकर यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

मालवण दि प्रतिनिधी
कट्टा येथील वराडकर हायस्कूलचे कलाशिक्षक श्री समीर चांदरकर यांनी आषाढी एकादशी च्या पार्श्वभूमीवर एका बल्ब मध्ये विठ्ठललाच प्रतिकृती साकारल्यने श्री चांदेरकर हे कौतुकाचा विषय बनले आहेत.


अंधारल्या मार्गावरी
कधी रुते पायी काटा
तुझ्यासंगे प्रवासात
प्रकाशमान जाहल्या वाटा
धावून येशील संकटात
देसी दुबळ्यांना हात
जरी आलो नाही पंढरपुरा
तुझी नित्य असे साथ..
थॉमस अल्वा एडिसन,,,, ज्यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला.

या शोधामुळे समस्त मानव जातीचे भवितव्य उजळून निघाले. पण कित्येक वर्ष अंधारात चाचपडत असलेल्या दिन दुबळ्यांना प्रकाशाची वाट दाखवणारा पांडुरंग आजही आपलं आयुष्यहे प्रकाशमय करीत आहे.
गेली दोन वर्ष तुझ्या दर्शनाला मुकलेले भक्तगण आज नव्या जोशात वारीत बेभान होऊन नाचत आहेत. सोसाट्याचा वारा ,पाऊस या कशाचीही तमा न बाळगता पांडुरंग नामी तल्लीन झालेले आहेत
.कोविड काळात वारकरी पंढरपूरला जाऊ शकले नाही, परिस्थिती फार गंभीर होती .आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण होता. खरंतर या काळात आपल्या प्रिय भक्तांना भेटण्यासाठी पांडुरंग कोणत्या ना कोणत्या रूपात मदतीला धावून आला.कधी डॉक्टर ,कधी पोलीस, तर कधी सफाई कर्मचारी बनुन त्याने आपल्या अस्तित्वाचा साक्षात्कार दिला.पांडुरंगाचा हाच साक्षात्कार या कलाकृतीच्या माध्यमातून साकार करण्याचा केलेला छोटासा प्रयत्न…
एका छोट्याशा बल्ब मध्ये माती पासून तयार केलेली तीन सेंटीमीटर उंचीची ही मूर्ती ब्लब मध्ये उतरवताना अनेक वेळा अपयश आले.परंतु मनाशी केलेल्या निर्धाराला पांडुरंगाने साथ दिली आणि ही कलाकृती पूर्ण झाली..

You cannot copy content of this page