10 जणांवर कारवाई
⚡कणकवली ता.०४-: कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील कोहिनुर सोशल क्लबच्या पडवीत सुरू असलेल्या जुगारावर छापा मारून जुगार खेळणाऱ्या 10 जणांना रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून 1 लाख 34 हजार 450 रुपयांची रोकड कणकवली पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई कणकवली पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विनायक चव्हाण, प्रोबेशनरी पीएसआय राजकुमार मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 3 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास केली.
मात्र या धाडीत एक आलिशान कार जप्त न करताच सोडण्यामागचे कारण गुलदस्त्यात आहे. छापा मारल्यानंतर आरोपींच्या ताब्यातील सर्व वाहनेही जप्त केली जातात.कणकवली पोलिसांनीच कणकवली शहरात काही महिन्यांपूर्वी जुगार अड्ड्यावर केलेल्या कारवाईत तर आरोपींचे मोबाईल, वाहने ही जप्त केली होती. कासार्डे येथे जुगार खेळताना पकडण्यात आलेल्या 10 आरोपीसह
कारसुद्धा पोलीस ठाण्यात आणण्यात आली होती. या छाप्यात जुगार खेळत असताना मंगेश तातु सोनवडकर ( वय ३६ रा. करबुडे ता.जि रत्नागिरी), अनिल मंगेश शीनकर, ( वय ६८ वर्षे रा. बंगलवाडी ता. राजापुर जि. रत्नागिरी ),विश्वनाथ गोपाळ मांगले, ( वय ६८ वर्षे रा. लांजा ता. रत्नागिरी ),अक्षय अनंत हुले, ( वय वर्षे ३६,रा. हरकुळ खुर्द ता. कणकवली ),अनिल चंद्रकांत चव्हाण ( वय ३४ वर्षे कोर्ले सहकारवाडी ता लांजा जि. रत्नागिरी )अनंत धर्माजी भोसले ( वय ६६ वर्षे रा. साखरपा ता. संगमेश्ववर जि. रत्नागिरी ), विजय यशवंत जाधव ( वय ५८ वर्ष इंदवटी ता लांजा जि. रत्नागिरी ), विकास शिवाजी चव्हाण, ( वय ३३ वर्ष रा. साखरपा ता. संगमेश्ववर जि. रत्नागिरी ), राजेश सुभाष चव्हाण ( वय ३८ वर्षे रा. कोलें ता लांजा जि. रत्नागिरी ), दिपक सदाशिव पेंडुरकर ( वय ३१ वर्षे रा. फणसगाव ता. देवगड जिल्हा सिंधुदुर्ग ) या आरोपीना रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन रात्री उशिरा सोडण्यात आले.
