कणकवली जळकेवाडी येथील
श्रीधर उर्फ शिरीभाऊ गुरव यांचे निधन

⚡कणकवली ता.०४-: कणकवली
शहरातील जळकेवाडी येथील रहिवासी श्रीधर उर्फ शीरी शिवराम गुरव (76) यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहिती मुली, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

श्रीधर गुरव हे उत्तम हर्मोनियम वादक होते. प.पू.भालचंद्र महाराज संस्थातील धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्याचा नेहमीच सहभाग असायचा.त्यांच्या निधनामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page