उपस्थित राहण्याचे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांचे आवाहन
⚡सावंतवाडी ता.०४-: मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे उद्या पासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून, सावंतवाडी मधून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. यावेळी उद्या सकाळी ११ वाजता हॉटेल मँगो येथे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असून, विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणी संदर्भात अमित ठाकरे विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधणार आहेत. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी केले आहे.
