तळवडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विविध उपक्रमांनी कृषी दिंन साजरा

बांदा/प्रतिनिधी
तळवडे इंग्लिश मीडियम स्कूल येथे मा. श्री. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. विविध फळझाडे, फुलझाडे, भाजी यांची लागवड करण्यात आली.


विद्यार्थ्यानी गटागटाने श्रमदान करून झाडे लावली. या कार्यक्रमानिमित्त प्रभात फेरी काढण्यात आली. तसेच वृक्षारोपण निमित्त झाडे जगवा जिवन वाचवा अशाप्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमास संस्थेच्या संचालिका सौ. मैथिली मनोज नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक अजय बांदेकर, सहाय्यक शिक्षक सौ. दर्शना देसाई, दीक्षा नाईक, स्वप्नाली तांबे, प्रणिता मयेकर, अंकिता पालकर, वसंत सोनुर्लेकर, श्रध्दा पाईनाईक, श्रीया माणगावकर, प्रियांका रेडकर आणि मदतीस निधी कांडरकर आदी उपस्थित होते.
फोटो :-
तळवडे प्रशाळेत वृक्षारोपण करताना मान्यवर शिक्षक व विद्यार्थी. (छायाचित्र – निलेश मोरजकर)

You cannot copy content of this page