बांदा येथे उद्यापासून मोफत योग शिबिर

स्वामी आनंददेव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन

⚡बांदा ता.०४-: प. पू. स्वामी रामदेव महाराज यांचे शिष्य स्वामी आनंददेव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात ५ ते ९ जुलै या कालावधीत भव्य व मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबीर ५ ते ९ जुलै रोजी पहाटे ५.३० ते ७ व ७ ते ८ जुलै रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत संपन्न होणार आहे. या शिबिरात सर्व आजारावर आवश्यक अशा अद्ययावत योग, प्राणायाम व आयुर्वेद उपचार यासंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे.

या शिबिराचे आयोजन पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान, महिला व युवा पतंजली यांनी केले असून हे शिबीर विनामूल्य आहे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी हे शिबीर खुले ठेवण्यात आले आहे. शिबिरासाठी अधिक माहितीसाठी सुदान केसरकर (मो. ९४२२०६५१५३), शेखर बांदेकर (मो. ९८२३८८१७१२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन भारत स्वाभिमान सिंधुदुर्ग या संस्थेचे अध्यक्ष महेश भाट यांनी केले आहे.

You cannot copy content of this page