घाट कोसळल्यास जबाबदार कोण ?
नागरिकांचा संतप्त सवाल
आंबोली, ता.३: येथील घाटातून सध्या १६ चाकी १८ चाकी अती अवजड गाड्या आंबोली तून दिवसा आणि रात्री देखील मोठ्या प्रमाणात जात आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाने १० चाकी पर्यंतच परवानगी दिलेली असताना मोठ्या प्रमाणात अती अवजड गाड्या जातातच कश्या आणि आंबोली घाटाची क्षमता पावसाळ्यात कमी असताना कोसळल्यास जबाबदार कोण असा सवाल आंबोली ग्रामस्थ करीत आहेत.
आंबोली घाटातून मोठ्या प्रमाणात अती अवजड वाहतूक होत आहे.दोन्ही बाजूने ये जा गाड्या होत आहेत.सार्वजनिक बांधकाम ने फक्त १० चाकी गाड्यांना परवानगी आहे घाटाची क्षमता कमी झाली असल्याने अती अवजड वाहतूक धोकादायक आहे असे जाहीर केलेले असताना येथून या प्रकारची बिनधास्त वाहतूक होत आहे.पावसाळ्यात आंबोली घाट दरीच्या बाजूने अती वजनाने आणि हादरुन खचल्यास जबाबदार कोण असा सवाल येथील ग्रामस्थ करीत आहेत.वाहतूक दार यांना तसे लेखी कळवणे ही जबाबदारी कोणाची?घाटातून अशा प्रकारची वाहतूक रोखणे ही जबाबदारी कोणाची? असा सवाल आंबोली ग्रामस्थ विचारीत आहेत.घाट खाचल्यास मोठे नुकसान होवू शकते.याचा प्रशासनाला विचार आहे की नाही त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आणि राज्य शासनाने ने याची दखल घ्यावी आणि तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी आंबोली ग्रामस्थ करीत आहेत.पोलिसांकडून अशा प्रकारे नियंत्रण होत नसल्याने सीमेवर कॅमेरा लावून वेगळी यंत्रणा कार्यक्षम करावी अशी मागणी शासनाकडे होत आहे.
