भाजपच्या लोकसभा प्रवास
योजनेची उद्या कणकवलीत बैठक

⚡कणकवली ता.०२-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात लोकसभा प्रवास योजना भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक काम वाढावे यासाठी सर्व प्रांतांमध्ये सुरु केली असून याचे कोल्हापूर, सातारा, हातकणंगले, रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदार संघाचे संयोजक प्रमोद जठार यांनी कोल्हापूर येथे बैठक घेतली.

या बैठकीला सहसंयोजक सुमंत घैसास तसेच महाराष्ट्र भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर , माजी आमदार अमल महाडिक महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे , संघटनमंत्री नाथजी पाटील , शौमिका महाडिक , विठ्ठलराव पाटील , गोपीचंद पडळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते .पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी महाराष्ट्रात अशा पद्धतीचे लोकसभा प्रवास योजना सुरु आहेत . 3 जुलै रोजी सकाळी 11 वाजता रत्नागिरी व दुपारी 4 वाजता कणकवली भाजप कार्यालयात या योजनेच्या बाबतीत बैठक होणार असून रत्नागिरी सिंधुदुर्गचे प्रमुख अतुल काळसेकर असणार आहेत सदर बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहे .

You cannot copy content of this page