जेष्ठ शिवसैनिक भाई गोवेकर यांनी घेतली पक्षप्रमुखांची भेट

सिंधुदुर्ग पाठीशी असल्याचा दिला शब्द

मालवण, दि प्रतिनिधी
मालवण येथील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्यासह जिल्ह्यातील ज्येष्ठ शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जिल्ह्यातील शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचा शब्द श्री. गोवेकर यांनी यावेळी श्री. ठाकरे यांना दिला.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. कोकणातील काही आमदार शिंदेंच्या गटात सहभागी झाल्याने कोकणातील शिवसेनेला धक्का बसला. मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिकांनी आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले. याच पार्श्वभूमीवर येथील माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांनी जिल्ह्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी बाबुराव धुरी, अजय पेंडूरकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज मुंबईत मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत सिंधुदुर्गातील शिवसेना तुमच्या पाठीशी असल्याचा ठाम विश्वास दिला.

You cannot copy content of this page