नरेंद्र डोंगरावरील जंगलात बीजारोपणाचा अभिनव

वन्यप्राण्यांना मिळणार जंगलातच खाद्य : सावंतवाडी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचा पुढाकार

⚡सावंतवाडी ता.०३-: वन्यप्राण्यांसह पशुपक्ष्यांना जंगलातच खाद्य उपलब्ध केल्यास खाद्याच्या शोधात शेती बागायतीसह भरवस्तीत येणाऱ्या वन्य प्राणी व पशू पक्ष्यांना जंगलातच रोखले जाऊ शकते. तसेच पर्यावरणाचा समतोल साधना जाणार आहे. याच उद्देशाने सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने नरेंद्र डोंगरावरील जंगलात बीजारोपणाचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमाअंतर्गत नरेंद्र डोंगरावरील जंगलात ठिकठिकाणी आंबा, फणस, जांभूळ या फळ देणाऱ्या झाडांच्या शेकडो बियांसह भोपळा, काकडी, दोडकी आदी शेकडो वेलवर्गीय बियांचे बीजारोपण करण्यात आले. तसेच यावेळी आंबा, फणस रोपे आदी शेकडो रोपांची लागवड करण्यात आली.

या बीजारोपणासह वृक्षारोपणातून जंगलातील जास्तीत जास्त क्षेत्र लागवडीखाली येणार आहे. तसेच जंगलातील वाढत्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा शेती बागायतीसह भर वस्तीतील उपद्रव कमी होणार असुन वन्य प्राण्यांकडून दिवसेंदिवस वाढणारी नुकसानीही टळणार आहे.

या बीजारोपण उपक्रमात डॉ प्रविणकुमार ठाकरे, डॉ मिहीर प्रभुदेसाई, डॉ विशाल पाटील, डॉ मुग्धा ठाकरे, डॉ स्वाती पाटील, अँड शामराव सावंत, सिए लक्ष्मण नाईक, भार्गवराम शिरोडकर, अनघा शिरोडकर, अँड्र्यू फर्नांडिस, प्रकाश पाटील, केदार बांदेकर, भगवान रेडकर, रवी जाधव, आनंद मेस्त्री, सिद्देश मणेरीकर, हुमैरा शेख, अंटोनेट फर्नांडिस, डॅनियल फर्नांडिस, पारस मेस्त्री, वेदांत गावकर, दीपक गावकर, फरजिन शेख, सई सावंत, सौ नाईक, सौ बांदेकर, राम बांदेकर, अद्विक पाटील आदीनी सहभाग घेतला.

You cannot copy content of this page