रोटरी मेंबर्सनी लोकसेवेचे काम आणखी
जोमाने करावे:नासिरभाई बोरसादवाला

रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचा 15वा इन्स्टॉलेशन कार्यक्रम उत्साहात

⚡कणकवली ता.०३-: कम टुगेदर’ हा रोटरी क्लबचा मूलमंत्र आहे. रोटरीमध्ये उच्च-नीच, काळा-गोरा, लहान-मोठा असा भेदभाव नसतो व आपण येथे लोकांची सेवा करण्यासाठी एकत्र येतो. याचा भान ठेवून सगळ्यांनी एकत्र येऊन काम केले करावे असा सल्ला डीजी रोटरीयन नासिरभाई बोरसादवाला यांनी दिला.रोटरीमध्ये 400 रोटरी मेंबर्स नव्हे तर 400 रोटरीयन्स यायला पाहिजेत असे सांगतानाच त्यांनी जयपूर फूट सारख्या प्रोजेक्टसाठी लागणारे साहित्य देण्याचे आश्वासन दिले. कुठच्याही प्रोजेक्टसाठी लागणारी मदत आणि पाठबळ देण्याचे वचन दिले.

रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचा 15वा इन्स्टॉलेशन कार्यक्रम संपन्न झाला. 2022-23 सालासाठी रोटरीची धुरा सांभाळणारी कार्यकारणी नियुक्त झाली. नवीन कार्यकारणीच्या प्रेसिडेंट – रो. वर्षा बांदेकर, सेक्रेटरी – रो. उमा परब, वाईस प्रेसिडेंट – रो. स्नेहलता राणे, ट्रेजरर – रो. माधवी मुरकर याना रोटरीची पिन देण्यात आली.

मुख्य कार्यक्रमा अगोदर पाककला स्पर्धा घेण्यात आली. सौ. शिरोडकर यांना त्यांच्या मुगाच्या मोदकांसाठी पहिले पारितोषिक मिळाले. डीजीई रोटरियर नासिरबाई बोरसादवाला हे या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते. 2021-22 चे प्रेसिडेंट रोटरियन विद्याधर तायशेटे यांनी त्यांच्या काळातला सेक्रेटरी रिपोर्ट वाचून दाखवला व त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला. त्यांनी आपल्या कार्यकाळात कार्डियाकअम्ब्युलन्स, स्वच्छता मोहीम, वैभववाडी क्लब आणि रोटट्रॅक क्लबची स्थापनाकेली. पेयजल वॉटर एटीएम या प्रोजेक्टसाठी रोटरी डिस्ट्रिक्टकडून मंजुरी घेतली. त्यांनी मोठ्या प्रमाणावर सर्वच स्तरावर रक्तदान व आरोग्य शिबिरे घेतली.
कणकवली शहराचे नगराध्यक्ष समीर नलावडे हे देखील उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या भाषणात स्विमिंग पूल व सिंधू महोत्सव, रोटरी व नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने करणार असे जाहीर केले. एजी रो.नीता गोवेकर यांनी या वर्षाची थीम इमॅजिन रोटरी याबद्दल माहिती व मार्गदर्शन केले. एरिया हेड रो.प्रणय तेली यांनी आपल्या भाषणात वेळोवेळी मदत करण्याची ग्वाही दिली. एजी रो.दीपक बेलवलकर यांनीही सर्वांना मार्गदर्शन केले. 2022-23 सालाच्या प्रेसिडेंट रोटरियन वर्षा बांदेकर यांनी रोटरी मधल्या आपल्या प्रवासाचे वर्णन केले. मुख्यत्वे आपण रोटरी मध्ये कसे आलो व या कारकिर्दीमध्ये आपण कशाप्रकारे काम करणार याची त्यांनी थोडक्यात माहिती दिली.
यावेळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टम करणारे तानाजी यादव, लक्ष्मण कदम आणि रुपेश जाधव यांचाही मोमेंटो व शाल श्रीफळ देऊन सन्मान केला गेला. त्याचबरोबर डॉक्टर्स डे च्या निमित्ताने उपस्थित डॉक्टरांचा पुष्पगुच्छ व मोमेंटो देऊन त्यांचा सत्कार केला.
सिंधुदुर्गातून आलेल्या 11 रोटरी क्लबच्या प्रतिनिधींनी आणि उपस्थिततांनी नवीन कार्यकारणीला पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. रोटरीन उमा परब यांनी आभार प्रदर्शन केले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

You cannot copy content of this page