Headlines

यश कॉम्प्युटर अकॅडमी खारेपाटणच्यावतीने १०वी/१२वी गुणवंत विद्यार्थ्यचा सत्कार

⚡कणकवली ता.०३-: खारेपाटण येथील यश कॉम्प्युटर अकॅडमीच्यावतीने खारेपाटण दशक्रोशीतील इयत्ता १० वी व १२ वी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व माहे मार्च/एप्रिल एमएससी आयटी बॅच चा निरोप समारंभ कार्यक्रम नुकताच शेठ न म विद्यालय खारेपाटण च्या कै.चंद्रकांत परिसा रायबागकर सभागृहात खारेपाटण वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खारेपाटणचे प्रबंधक मनीष झा, उद्योजक सुकांत वरूणकर,खारेपाटण हायस्कुलचे मुख्यध्यापक संजय सानप खारेपाटण शिक्षण संस्थेचे संचालक राजेश वारंगे,सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष पाटणकर,स्वामी समर्थ निखरे मठ केळवली ता राजापूरचे मठाधिपती स्वामी नकाशे यश कॉम्प्युटर अकॅडमी खारेपाटण च्या संचालिका मेघना गुरव संचालक श्री मंगेश गुरव कॉम्प्युटर शिक्षिका श्रीम फरिदा पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.

खारेपाटण हायस्कुलचे मुख्यध्यापक संजय सानप व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए डी कांबळे यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलित करून उदघाटन करण्यात आले.यश कॉम्प्युटर खारेपाटण अकॅडमी च्या संचालिका सौ.मेघा गुरव यांच्या शुभहस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.यावेळी कॉम्प्युटर क्लास मधील विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.तर १० वी /१२ वी गुणवंत विद्यार्थी याचा युवा उद्योजक सुकांत वरूनकर,बँक ऑफ महाराष्ट्र् शाखा खारेपाटण चे ब्रँच मॅनेजर मनीष झा व स्वामी नकाशे याच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गुण गौरव करण्यात आला.

यावेळी प्राचार्य डॉ.कांबळे यांनी विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणा बरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणे काळाची गरज असल्याचे सांगितले.तर खारेपाटण हायस्कुलचे मुख्यध्यपक सानप सर यांनी ‘जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही कोणतेही यश मिळवु शकता मात्र त्याला परिश्रमाची देखील गरज असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक यश कॉम्प्युटर अकॅडमीचे संचालक मंगेश गुरव यांनी केले.तर सर्वांचे आभार संचालिका सौ .मेघा गुरव यांनी मानले.

You cannot copy content of this page