वेंगुर्ला तालुक्यातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी…

वेंगुर्ले

     कोणी – कुठेही गेले तरी वेंगुर्ले तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम राहतील, असा निर्णय वेंगुर्ले तालुका शिवसेना  कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.शिवसेना वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. 

यावेळी बोलताना यशवंत परब म्हणाले की,२० जून रोजी महाराष्ट्र राज्य विधानपरिषद निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटेपासून शिवसेनेला हेलावणारी घटना समोर आली.एकनाथ शिंदे व अन्य आमदारांचा गट गुजरातमध्ये गेल्याची बातमी झळकली.बहुसंख्य आमदार शिंदे यांच्यासोबत असल्याची बातमी प्रसारमाध्यमांवर येत असताना या मतदारसंघाचे आमदार असलेले दिपक केसरकर हेही त्या गटात सामील झाल्याची बातमी आज गुरुवारी सोशल माध्यमांवर येत आहे.परंतु कोणी – कुठेही गेले तरी वेंगुर्ले तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम राहणार,असा एकमुखी निर्णय झाला आहे. यावेळी पदाधिकारी यांच्या वतीने पक्ष कार्यालयासमोर जोरदार घोषणा देण्यात आल्या.यावेळी शहरप्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, सचिन देसाई,उपतालुकाप्रमुख उमेश नाईक,युवासेना चे पंकज शिरसाट,दाभोली सरपंच उदय गोवेकर, वायंगणी सरपंच सुमन कामत,संदिप केळजी,दयानंद खर्डे,संजय गावडे, आनंद दाभोलकर, शैलेश परुळेकर,अण्णा वराडकर,गजानन गोलतकर,वेदांग पेडणेकर, सुयोग चेंदवणकर,राणे,कौशल मुळीक,बटा आदींसह शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page