बालविकास प्रकल्प संचालिका वैष्णवी आचरेकर यांचे प्रतिपादन…
मालवण दि प्रतिनिधी
आज शारीरिक आजाराप्रमाणे मानसिक आजाराचे प्रमाण वाढत चालले असून आपले बरेच शारीरिक व मानसिक आजार हे योगा आणि प्राणायम यामुळे नियंत्रित राहू शकत असल्याने प्रत्येकाने योगाचे शास्त्रशुद्ध ज्ञान घेऊन नियमितपणे योगा केल्यास आपले आरोग्य सुदृढ राहील असे प्रतिपादन बालविकास प्रकल्प संचालिका सौ. वैष्णवी आचरेकर यांनी येथे बोलताना केले
मालवण येथील बॅ .नाथ पै सेवांगण संचालित कौटुंबिक सल्ला केंद्राच्या वतीने योगदिन साजरा करण्यात आला.
यावेळी बालविकास प्रकल्प संचालिका सौ. वैष्णवी आचरेकर यांनी उत्तम आरोग्यासाठी योगाचे महत्त्व पटवून देतानाच त्यांनी योगासनाचे त्यांनी विविध प्रकार प्रात्यक्षिकासह सर्वांकडून करून घेतले. यामध्ये पद्मासन, वज्रासन, भुजंगासन, मकरासन, नौक यांचा समावेश करण्यात आला होता. या कार्यक्रमात सेवांगणचे सर्व कर्मचारी तसेच सेवांगण मार्फत चालविण्यात येणाऱ्या शिवण क्लासच्या विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या.
