आरटीएसई परीक्षेत रेवन राऊळ जिल्ह्यात प्रथम

⚡कणकवली ता.२२-: एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या आरटीएसई या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत सध्या खारेपाटण हायस्कुल येथे इयत्ता ५ वी च्या वर्गात शिकणारा कु रेवन अनंत राऊळ हा विद्यार्थी इयत्ता ४ थी मध्ये २०० पैकी १८४ गुण मिळवून राज्यात प्रथम आला आहे.त्याच्या या दैदिपम्यान यशा बद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटणचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या हस्ते त्याचा शाळेत सत्कार करण्यात आला.


कु.रेवन अनंत राऊळ हा विदयार्थी इयत्ता ४ थी मध्ये जि प पूर्ण प्राथमिक रामेश्वर नगर शाळा खारेपाटण येथे शिकत होता.आर टी एस ई परीक्षेचे मार्गदर्शक शिक्षक श्री संजय भोर सर यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. त्याच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी खारेपाटण हयस्कुलचे मुख्यध्यापक श्री संजय सानप,संस्थेचे संचालक श्री भाऊ राणे,राजेश वारंगे,नंदकिशोर कोरगावकर,शाळेच्या शिक्षिका श्रीम स्वप्नाली कांबळे मॅडम,संगाप्पा गुरव,संतोष राऊत,अजय गुरसाळे,गुणवंत विद्यर्थ्यांचे पालक श्री.अनंत राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page