नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत
⚡सावंतवाडी ता.२२-: २१ जुन रोजी जागतिक योगा दिन डॉ. रश्मि शुक्ल M.D आयुर्वेद मुंबई युनिव्हर्सिटीयांच्या श्री. शुभं भवतु दवाखाना, भटवाडी दत्तमंदीरासमोर, सावंतवाडी येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षा माजी नगरसेविका सौ. दिपाली भालेकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा झाला.
यावेळी माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांचे या योग शिबिराला बहूमोल असे मार्गदर्शन लाभले.
योगगुरु सौ. स्वाती गगनग्रास, योगशिक्षिका सौ. शितलताई माने तसेच गुरुवर्य श्री. दिलीप माने (प्राथमिक शिक्षक) या योगविषयातील उत्तम अनुभव असलेल्या व योगसाधना समर्पित वृत्तीने करणा-या दिग्गज व्यक्तींचे मार्गदर्शन सर्व लाभार्थ्यांना मिळाले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व नियोजन डॉ. रश्मि शुक्ल यांनी केले गुरुवर्य श्री. दिलीप माने व सौ. स्वाती गगनग्रास यांनी योगाची माहीती, तणावरहीत जिवनशैली गुरुकील्ली याविषयी बहूमोल मार्गदर्शक केले. योगशिक्षक सौ. शितल माने यांनी सुक्ष्मव्यायाम, योगासने, प्राणायम व सुर्यनमस्कार यांचा अतिशय सुंदर खास त्यांच्या शैलित सर्व उपस्थित लाभार्थिकडून सराव करुन घेतला.
अध्यक्षमहोदय सौ.दिपाली भालेकर यांनी सर्व योगासने सराव करुन सदर कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.अध्यक्षा मा.नगरसेविका दिपाली भालेकर,योगशिक्षक सौ. स्वाती गगनग्रास, सौ. शितल माने, श्री. दिलीप माने यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
सदरील कार्यक्रम हा डॉ. रश्मि यांच्या श्री. शुभं भवतु क्लीनीक तर्फे सर्व लाभार्थ्यासाठी मोफत नियोजित केला गेला होता.
या कार्यक्रमाला डॉ. पवार सर (SPK College सावंतवाडी) चे प्राध्यापक यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच यावेळी भटवाडी येथील सौ. चव्हाण, सौ. लाड, निलम भालेकर सौ.शेख, मयुरेश सुतार, ओवी कोळंबेकर , सौ. नाईक इत्यादींनी योग मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
