एबी स्विच बंद करण्यासाठी गेलेल्या वीज वितरणाच्या राकेश मोंडकर यांचा आकस्मित मृत्यू …

⚡देवगड ता.२१-: इळये येथिल स्मशानभूमी येथील एबी स्विच बंद करण्यासाठी वीज वितरणचे बाह्य सूत्र कर्मचारी राकेश रमेश मोंडकर (३३) रा. तांबळडेग हे गेले होते त्याठिकाणी ते खाली पडलेल्या अवस्थेत आढळून आले. अशी फिर्याद मरावीवि कर्मचारी प्रकाश कृष्णाजी मुंबरकर यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली त्यानुसार देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली..

ही घटना सोमवारी सायंकाळी ६.१५ वा. सुमारास घडली.असल्याचे कळते.याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, वीज वितरणच्या इळये विभागाचे बाह्य सूत्र कर्मचारी राकेश रमेश मोंडकर हे सायंकाळी ६.१५ वा. सुमारास इळये येथील स्मशानभूमी येथील एबी स्वीच बंद करण्यासाठी गेले होते.

त्याठिकाणी पोलच्या बाजुलाच पडलेल्या अवस्थेत दिसले त्यांना सरकारी कर्मचारी व इळये ग्रामस्थांनी तात्काळ देवगड मध्ये खासगी हॉस्पिटल तसेच ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारापुर्वीच ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांचा मृतदेह शवविच्छेनासाठी देवगड ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. ही घटना समजताच वीज वितरणचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले.

दरम्यान वीज वितरणचे. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही . शवविच्छेदनानंतर मृत्युचे कारण स्पष्ट होईल.अशी माहिती वीज वितरण अधिकाऱ्यांनी दिली .मोंडकर गेली कंत्राटी वायरमन म्हणून काम करीत होते. त्यांचा पश्चात पत्नी व आई वडील असा परिवार आहे.अधिक तपास पोलीस हवालदार उदय शिरगावकर करीत आहेत.

You cannot copy content of this page